कराड जवळील अनाथाश्रमात गैरप्रकार उघडकीस; दोघांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड नजिक असलेल्या टेंभू गावात सुरू असलेल्या अनाथाश्रमात तेथील लहान मुलींना अमानवी वागणूक दिली जात असून तेथे दारूविक्री तसेच एक महिलेकडून देहविक्री करवून घेतली जात असल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली असून प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी 'एक्स' वर केलेल्या एका पोस्टमुळे हा विषय चर्चेत आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कराडजवळील टेंभू गांवातल्या 'छत्रछाया' या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे ! आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती...

या सेक्स स्कँडलमध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे.

असो. आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी 'चीप' मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे 'लापता' आहेत."


माने यांच्या या पोस्टनंतर टेंभू गावातील 'छत्रछाया' या अनाथाश्रमातील अनेक गैरप्रकार चर्चिले जाऊ लागले आहेत,आई चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून हा आश्रम चालविला जात असून त्याची संचालिका अनाथ लहान मुलींकडून पाय दाबून घेण्यासारखे प्रकार करून घेत असून तेथे दारूविक्री आणि देहविक्री होत असल्याची चर्चा सुरू असून या संदर्भात काही व्हिडिओही व्हायरल झाले असल्याचे समजते.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. 


कराड जवळील अनाथाश्रमात गैरप्रकार उघडकीस; दोघांना अटक कराड जवळील अनाथाश्रमात गैरप्रकार उघडकीस; दोघांना अटक Reviewed by ANN news network on ८/२३/२०२४ १०:५३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".