महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांचा आक्रोश; मोहननगरमध्ये धडक मोर्चा

 


पिंपरी-चिंचवड: महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या मोहननगर, चिंचवड स्टेशन, आनंद नगर, साईबाबा नगर, गवळीवाडा, इंदिरानगर, काळभोर नगर, महात्मा फुले नगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकर नगर, परशुराम नगर या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी, 20 ऑगस्ट 2024 रोजी  माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली "जन आक्रोश धडक मोर्चा" काढून आपला रोष व्यक्त केला.

महावितरणच्या वीज पुरवठ्यामुळे या विभागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान होत आहे, तसेच डेंगू आणि चिकनगुनियाच्या साथीमुळे अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. वीज नसल्यामुळे चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर अनेकदा निवेदने देऊनही कोणताही कायमस्वरूपी उपाय निघाला नाही, त्यामुळे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर येथून झाली. मोर्चाने महात्मा फुले नगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर, परशुराम नगर मार्गे थरमॅक्स चौकातील महावितरणच्या आकुर्डी विभागीय कार्यालयावर धडक दिली. मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोर्चाच्या समोर महावितरणचे मुख्य अभियंता अतुल देवकर आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव आले आणि त्यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चाच्या सहा मागण्यांवर लेखी उत्तर दिले.

या मोर्चामध्ये सामाजिक, राजकीय, व्यापारी, लघुउद्योजक, हातगाडी पथारी धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी उचललेले हे पाऊल महावितरणच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांचा आक्रोश; मोहननगरमध्ये धडक मोर्चा  महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांचा आक्रोश; मोहननगरमध्ये धडक मोर्चा Reviewed by ANN news network on ८/२१/२०२४ ०९:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".