उरण : उरण शहरातील व ग्रामीण भागातील विविध नागरी समस्यांना न्याय मिळविण्यासाठी शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर व तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला.
अनेकवेळा पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाला सूचित करूनही समस्यांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने, शिवसेनेने धडक मोर्चाचे आयोजन केले. यामध्ये वीज, रस्ते, आरोग्य, शासकीय कार्यालयांमधील अव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था, अमली पदार्थांची विक्री, महिला असुरक्षिततेसह विविध नागरी समस्यांवर लक्ष वेधण्यात आले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तहसीलदार उद्धव कदम यांनी सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून, आठ दिवसांच्या आत सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेने आंदोलन स्थगित केले.
तरीही आठ दिवसांत समस्या सोडवल्या नाहीत किंवा जनतेला न्याय मिळाला नाही, तर शिवसेना खोपटे रोडवर तीव्र चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेने ही धडक कारवाई राबविली असून, नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली आहे.
Reviewed by ANN news network
on
८/०८/२०२४ ०७:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: