पुणे: विश्रांतवाडी परिसरात पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ९ ऑगस्ट रोजी एक कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना पकडले आणि त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.
गस्त घालत असताना टिंगरे नगर परिसरात रस्त्याच्या बाजूला मोटरसायकलवर उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले. त्यावेळी त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना तत्काळ पकडले. चौकशीत त्यांची नावे श्रीनिवास संतोष गोदजे आणि रोहित शांताराम बेंडे असल्याचे समजले. त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ६०० रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले.
पोलिसांनी अधिक चौकशी करताच त्यांनी आपल्या साथीदाराचे नाव निमेश आबनावे सांगितले. आबनावे याला टिंगरे नगर येथून ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्या कारमधून ९४ लाख २६ हजार ३६० रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ कोटी ८० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये कार, मोबाईल, वजनकाटा, आणि मोटारसायकल यांचा समावेश आहे, जप्त केला आहे.
अमलीपदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक दिंगबर कोकाटे, गौरव देव, आणि त्यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.
Reviewed by ANN news network
on
८/१२/२०२४ ०४:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: