पुण्यात बारमधील बिलावरून वाद; डोक्यात घणाचे घाव घालून सराईत गुन्हेगाराची हत्या

पुणे: सिंहगड रोड परिसरातील एका बारमध्ये बिलावरून झालेल्या वादात गोट्या उर्फ अमोल शेजवळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रोड) या सराईत गुन्हेगाराची २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री डोक्यात घणाचे घाव घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वीर बाजी पासलकर (वडगाव) पुलाजवळील क्लासिक बारसमोर घडली. गोट्या शेजवळ आणि त्याचे मित्र क्लासिक बारमध्ये दारू पित बसले होते. रात्री साडेबारा वाजता बार व्यवस्थापक आणि गोट्या यांच्यात बिलावरून वाद सुरू झाला. गोट्या बारमधून बाहेर पडत असताना बाऊन्सरने त्याला अडवले आणि त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. बाऊन्सरने बारजवळील टायर पंक्चर दुकानातून हातोडा आणून गोट्याच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात गोट्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (अपराध) राघवेंद्र क्षीरसागर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. शहरातील अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. बार आणि पबमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक कठोर नियम लागू करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

पुण्यात बारमधील बिलावरून वाद; डोक्यात घणाचे घाव घालून सराईत गुन्हेगाराची हत्या  पुण्यात बारमधील बिलावरून वाद; डोक्यात घणाचे घाव घालून सराईत गुन्हेगाराची हत्या Reviewed by ANN news network on ८/२३/२०२४ १२:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".