कोेकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा आज सायंकाळी स्नेहमेळावा

 


पिंपरीः- कोेकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा स्नेहमेळावा आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर येथे सायंकाळी 5 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे,

या कार्यक्रमाला एस.एस.सी बोर्डाचे सहायक सचिव अनिल गुंजाळ, पिंपरी चिंचवड काँग्रेसच शहराध्यक्ष  कैलास कदम, उद्योजक गणेश यादव, डायमंड पब्लिकेशनचे चेअरमन दत्तात्रय पाष्टे, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, माजी नगरसेविका निर्माला कदम, मनोहर यादव आदि मान्यवर यावेळी उपस्थित रहाणार आहे.

यावेळी लहान मुलांचा व महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून दहावी, बारावी तसेच विविध परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच महिला उद्योजिका प्राजक्ता चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुलभा सदानंद यादव व नुकतेच कोकण खेड युवाशक्ती संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या संदिप साळुंखे यांचा देखिल यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त स्रभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अशोक कदम व महिला अध्यक्षा वैजयंती कदम यांनी केले आहे.

कोेकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा आज सायंकाळी स्नेहमेळावा कोेकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा आज सायंकाळी स्नेहमेळावा Reviewed by ANN news network on ८/११/२०२४ १२:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".