पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी परिसरातील पूरस्थितीचे निरीक्षण केले आणि पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावेळी विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोर्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, भाजपा शहर अध्यक्ष शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे, नाना काटे, प्रशांत शितोळे हे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांना पूर आला. परिणामी, हाऊसिंग सोसायट्या, घरे आणि नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले. सुमारे एक हजार नागरिकांना आश्रय केंद्रे आणि नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगवी परिसरात पूरस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ मदत कार्य हाती घेण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौर्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही सुरू केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: