नवी दिल्ली : सेंट मार्टिन बेट, बांगलादेशच्या ईशान्य भागात बंगालच्या उपसागरात असलेले एक छोटे प्रवाळ बेट आहे. सुमारे तीन चौरस किलोमीटरच्या या बेटावर अमेरिकेचा तळ असणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते, कारण भारताच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी सुविधा या बेटाजवळील किनारपट्टीवर आहेत.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला सोपविण्यास नकार दिल्याने त्यांचे सत्तेवरून पायउतार होण्याचे दावे करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात (१० ऑगस्ट) हसीनांच्या कथित भाषणाचे काही भाग जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये असे त्यात म्हणण्यात आले आहे की, जर त्यांनी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट सोपविले असते, तर त्या अजूनही सत्तेवर राहिल्या असत्या.
परंतु, हसीनांच्या पुत्राने हे दावे फेटाळले असून हे वक्तव्य पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, या आरोपांमागील तत्थ्य काहीही असले तरी भारताच्या सुरक्षेसाठी हे गंभीर आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर काही अत्यंत महत्त्वाच्या लष्करी सुविधा आहेत. या सुविधांमध्ये आंध्र प्रदेशातील रामबिली येथे बांधकाम सुरू असलेला आयएनएस वर्षा नावाचा नौदल तळ आहे, ते भारताच्या क्षेपणास्त्रधारी अण्वस्त्र पाणबुड्यांचे ठिकाण होणार आहे. याशिवाय ओडिशाच्या किनाऱ्यावरून भारत आपल्या क्षेपणास्त्र चाचण्या घेत असतो.
सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेचा लष्करी तळ असल्यास, भारताच्या या अण्वस्त्र ताफ्यावर अमेरिकेला लक्ष ठेवता येईल. त्यामुळे अमेरिकेचा हा तळ भारताच्या रणनीतिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो.
सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेचा लष्करी तळ उभा राहिल्यास येत्या काळात अमेरिकेचे भारताच्या सुरक्षाविषयक प्रगती आणि हालचालीवर लक्ष राहील. त्यामुळे सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेचा तळ असणे भारताच्या हीताचे नाही. शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर, अमेरिकेका या बेटावर तळ स्थापन करण्यासाठी नव्या अंतरिम सरकारवर दबाव आणण्याची शक्यता आहे, तेव्हा काय होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२४ १२:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: