पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाकडून आयोजित शिवस्वराज्य यात्रा २ ची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून होणार आहे. या यात्रेचे भव्य स्वागत पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथे सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी ८ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच पातळीवर सध्या घसरण झाली आहे. या समस्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
अजित गव्हाणे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमध्येही भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि बेरोजगारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे.
शिवस्वराज्य यात्रा जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, भोसरी, शिरूर, हडपसर, खडकवासला, दौंड, इंदापूर, बारामती, माळशिरस, मोहोळ, सोलापूर उत्तर, माढा, करमाळा, परांडा, तुळजापूर, उदगीर, अहमदनपूर, केज, आष्टी, बीड, माजलगाव, परळी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, बसमत, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन या भागातून मार्गक्रमण करणार आहे.
Reviewed by ANN news network
on
८/०८/२०२४ ०३:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: