पिंपळे सौदागर: जोरदार पावसामुळे पिंपळे सौदागर येथील काटे वस्ती, कुंजीर कॉलनीमध्ये मोठे झाड पार्क केलेल्या कारवर कोसळले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्यामुळे महावितरणच्या विजेच्या ताराही रस्त्यावर पसरल्या होत्या, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नाना काटे व शत्रुघ्न काटे यांनी तात्काळ महावितरण आणि अग्निशामक दलाला कळवले. घटनास्थळी महावितरण आणि अग्निशामक विभागाचे कर्मचारी वेळेत पोहोचले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन विभागाने कारवर पडलेले झाड काढले आणि महावितरण विभागाने विजेच्या तारांचे निवारण केले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण आणि नगरपालिकेने झाडांची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०९/२०२४ १०:११:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: