पिंपरी : चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या शिरगाव पोलीसठाण्यातील दोन पोलिसांना चार परप्रांतीय भंगारवाल्यानी जबर मारहाण केली. या घटनेत भंगारवाल्यांनी डोक्यात लोखंडी सळईने वार केल्यामुळे एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास साळुंब्रे येथे घडली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अली अब्दुल शेख यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी नईम शहा (वय 23), नसीम शहा (वय 35), कलीम शहा (वय 25), नसीम मुदही (वय 24), कलीम मुदही (वय 18, सर्व रा. गोडूंब्रे, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार अली अब्दुल शेख आणि अनिल निरवणे एका चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींच्या भंगार दुकानात गेले होते. त्यांनी पण पोलीस असल्याचे आरोपींना सांगितले. मात्र, त्याला न जुमानता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. लोखंडी सळईने मारहाण केली.
Reviewed by ANN news network
on
७/०८/२०२४ ०५:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: