भूमिअभिलेख विभागातील सेवानिवृत्त उपसंचालकावर अ‍ॅन्टीकरप्शनच्या कारवाईचा बडगा

 

पुणे : नागपूर येथे भूमिअभिलेख विभागात उपसंचालक पदावर सेवा करून निवृत्त झालेल्या एका अधिकार्‍यासह त्याच्या पत्नीवर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी अ‍ॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे येथील कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे भूमिअभिलेख विभागात खळबळ माजली आहे.

दादाभाऊ सोनू तळपे, वय-६२ आणि त्यांची पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे, वय- ५८,  दोघेही राहणार हर्मिस हेरीटेज, येरवडा, पुणे अशी आरोपींची नावे आहेत.

२१ फेब्रुवारी १९८१ ते  ३१ मार्च २०१४ या काळात दोन्ही आरोपींनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी त्यांची अ‍ॅन्टीकरप्शन खात्यातर्फे चौकशी चालू होती. या चौकशीत त्यांच्याकडे २८ लाख ५२ हजार ५४१ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा ही रक्कम १७.७४ टक्के अधिक आहे. ही संपत्ती त्यांनी कशी जमविली याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना वारंवार संधी देण्यात आली. मात्र, ते याबतचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. ही संपत्ती दादाभाऊ तळपे यांच्या पत्नी कल्पना तळपे यांच्या नावावर असल्याने त्यांनाही जबाबदार धरून त्या दोघांविरोधात अ‍ॅन्टीकरप्शन खात्याचे निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी येरवडा पोलीसठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ४१६/२०२४ क्रमांकाने आणि भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम १३ (१) (इ), १३ (२), सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, (सुधारीत अधिनियम सन २०१८ ) चे कलम १३(१)(ब), १३ (२) सह भा.दं.वि. कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक  श्रीराम शिंदे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

भूमिअभिलेख विभागातील सेवानिवृत्त उपसंचालकावर अ‍ॅन्टीकरप्शनच्या कारवाईचा बडगा भूमिअभिलेख विभागातील सेवानिवृत्त उपसंचालकावर अ‍ॅन्टीकरप्शनच्या कारवाईचा बडगा Reviewed by ANN news network on ७/०३/२०२४ ०२:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".