पुणे : "भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयाने हा अर्थसंकल्प मांडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो," अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्राच्या सल्लागार समिती सद्स्य राजेश पांडे यांनी दिली आहे.
"गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या कल्याणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रोजगार, कौशल्य विकास, लघु व मध्यम उद्योग आणि मध्यमवर्गीय हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख मुद्दे आहेत," असे त्यांनी नमूद केले.
"शिक्षण क्षेत्रासाठी १ लाख २५ हजार ६३८ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना माफक व्याजावर दहा लाखांचे कर्ज, युवकांना पहिल्या नोकरीत आर्थिक सहाय्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार वाढीचे उद्दिष्ट निश्चित करणारा हा अर्थसंकल्प खरोखरच संतुलित आहे," असे त्यांनी सांगितले.
पुढील पाच वर्षांत २० लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण, १००० औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचे अद्ययावतीकरण, उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना यामुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२४ ०८:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: