धक्कादायक प्रकार; नराधम बापासह चौघांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

 


पाच आरोपी गजाआड

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर तिच्या बापासह अन्य चौघांनी वेळोवेळी बलात्कार केला असून हा प्रकार असह्य झाल्यानंतर त्या मुलीने चिखली पोलीसठाण्यात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये समाधान लवटे (वय ४०), प्रताप प्रमोद धायतडे, नितीन हराळे (वय ३२), सागर हराळे (वय २०) आणि पीडित मुलीच्या वडिलांच्या समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांसह तिच्या शिक्षिकेचा पती, आईच्या मैत्रिणीचा पती आणि दिर यांनी या अल्पवयीन मुलीवर ८ एप्रिल ते २९ जून २०२४ दरम्यान  बलात्कार केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी युट्यूबवर एक व्हिडीओ पाहत असताना समाधान लवटे तिच्या घरी आला आणि "त्या व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू", असे म्हणत तिला घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबद्दल मुलीने तिच्या वडिलांना सांगितले असता, वडिलांनी "कोणालाही काही सांगू नको, आपली इज्जत जाईल."  असे सांगून गप्प बसविले. त्यानंतर, वडिलांनी देखील तिच्यावर बलात्कार केला आणि विरोध केल्यास अथवा कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर

मुलगी तिच्या शिक्षिकेच्या घरात ट्यूशनसाठी गेली असता, शिक्षिकेच्या पतीने संधीचा फायदा उचलून तिच्यावर बलात्कार केला. १९ मे रोजी, मुलीच्या आईच्या मैत्रिणीच्या दिराने बलात्कार केला आणि २ जून रोजी, आईच्या मैत्रिणीच्या पतीने देखील बलात्कार केला. २९ जून रोजी रात्री मुलीच्या वडिलांनी पुन्हा बलात्कार केला.

हा प्रकार असह्य झाल्यानंतर त्या मुलीने ५ जुलै रोजी शाळेतून थेट चिखली पोलिस ठाण्यात जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक प्रकार; नराधम बापासह चौघांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार! धक्कादायक प्रकार; नराधम बापासह चौघांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार! Reviewed by ANN news network on ७/०७/२०२४ ०१:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".