विद्यापीठातील वित्त अधिकार्‍याला ८१ हजार रुपये लाच घेताना अटक!

महाड : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील वित्त अधिकार्‍याला ठेकेदाराकडून ८१ हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने ५ जुलै रोजी लोणेरे येथे रंगेहाथ पकडले. विद्यापीठातील वर्ग १ दर्जाच्या अधिकार्‍याला पकडल्यामुळे लोणेरे परिसरात खळबळ माजली आहे.

ओंकार रामचंद्र अंबपकर (वय ५५ रा. आनंद नगर, डी १०३, लोणेरे, माणगाव, रायगड) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. विद्यापीठात ठेकेदार म्हणून काम करणार्‍या एक व्यक्तीने त्यांच्याविरोधात रायगड अ‍ॅन्टीकरप्शन कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

या ठेकेदाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील एका सभागृहाचे बांधकाम केले होते. अंबपकर यांनी त्याचे १९ लाख ४२ हजार ८३८ रुपयांचे बिल मंजूर केले होते. ४७ लाख ७५ हजार ३४ रुपयांचे बिल मंजूर करावयाचे होते. त्यासाठी अंबपकर यांनी एक लाख रुपये लाच मागितली. त्याबद्दल ठेकेदाराने अ‍ॅन्टीकरप्शनकडे तक्रार केली. अ‍ॅन्टीकरप्शनच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी अंबपकर यांनी तडजोडीअंती ८१ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानंतर अ‍ॅन्टीकरप्शनच्या पथकाने ५ जुलै रोजी सापळा रचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील वित्त विभागात असलेल्या अंबपकर यांच्या कार्यालयात त्यांना ८१ हजार रुपयांची लाच घेताना 'रंगेहाथ' पकडले.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहायक फौजदार विनोद जाधव, अरूण करकरे, अंमलदार महेश पाटील, चालक सागर पाटील यांनी केली.

विद्यापीठातील वित्त अधिकार्‍याला ८१ हजार रुपये लाच घेताना अटक!  विद्यापीठातील वित्त अधिकार्‍याला ८१ हजार रुपये लाच घेताना अटक! Reviewed by ANN news network on ७/०७/२०२४ ०४:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".