कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी विनामूल्य शस्त्रक्रिया शिबीर

 


 'फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया 'चे लोकसंख्या दिनापासून आयोजन

पुणे : कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी  फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे शाखेच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनापासून म्हणजे ११ ते १९ जुलै  २०२४ दरम्यान  विनामूल्य पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले असून  नावनोंदणी करावी ,असे आवाहन  असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष  अॅड. अवलोकिता माने यांनी केले आहे.

विनामूल्य नोंदणीसाठी  दूरध्वनी क्रमांक अभिजित लोंढे  ९७६७६०३९००, अली सय्यद ९०९६३१२७३९ येथे  संपर्क साधता येईल. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन , २o२, वेस्टर्न कोर्ट, १०८२ / अ ,गणेशखिंड, ( ई स्क्वेअर थिएटरसमोर ) पुणे -१६ येथे दुपारी १२ ते ३ वेळात हे शिबिर होईल.ही सेवा इतर दिवशीही उपलब्ध राहणार आहे.

नसबंदी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन :

७ मिनिट वेळेची ही शस्त्रक्रिया असून  अर्धा तास आराम केला कि  दैनंदिन कामे करता येतात.  पुरुष नसबंदी केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी  संस्थेकडून रुपये ५०००  तर पुरुष नसबंदी साठी तयार केलेल्या दूत व्यक्तीस संस्थेकडून रुपये १००० देण्यात येणार आहे. आधारकार्ड ची प्रत, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत घेऊन यावे ,असे आवाहन करण्यात आले आहे. 

पुरुषांचा सहभाग आवश्यक

'स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्र क्रियेपेक्षा पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया सोपी आहे . लग्न करून घरात येणारी पत्नी घर सांभाळण्यापासून संततीला जन्म देणे ,संगोपन ,घरकामाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असते . म्हणून कुटुंब नियोजनाची जबाबदारीही तिच्यावर टाकण्यापेक्षा पुरुषांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे',असे  फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या पत्रकात म्हटले आहे. 

कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी विनामूल्य शस्त्रक्रिया शिबीर कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी विनामूल्य शस्त्रक्रिया शिबीर Reviewed by ANN news network on ७/१०/२०२४ ०४:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".