पुणे: आंतरधर्मीय विवाहामुळे एका तरुणाचा अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अठरा दिवसानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केली.
खून झालेल्या तरुणाचे नाव:
अमिर मोहम्मद शेख (वय 25, रा. आदर्शनगर, मोशी. मूळ रा. रांधे, ता. पारनेर, जि. अहमदनगर).
आरोपींची नावे:
- पंकज विश्वनाथ पाईकराव (वय 28, रा. चाकण. मूळ रा. भिंगे आडगाव, ता. हिंगोली, जि. हिंगोली)
- सुशांत गोपाळा गायकवाड (वय 22, रा. रांधे, ता. पारनेर, जि. अहमदनगर)
- गणेश गायकवाड (रा. रांधे, ता. पारनेर जि. अहमदनगर)
- सुनिल किसन चक्रनारायण (वय 33, रा. चाकण, पुणे)
- गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी फरार आहे.
घटनाक्रम:
- 16 जून: एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंगची तक्रार आली होती. बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने तक्रार दिली होती. तपास करताना तक्रारदार महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
- तक्रारदार महिलेच्या बहिणीचा पती पंकज याने महिलेच्या पतीला फोन करून बोलावून घेतले होते.
- 17 जून: आरोपींनी अमीर याला फोन करून दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. त्याला दारू पाजून चाकण-आळंदी रोडच्या कडेला मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील जंगलात नेऊन दगडाने ठेचून ठार मारले. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची हाडे व राख नदीत टाकून पुरावा नष्ट केला.
- 29 जून: पंकज आणि सुशांत यांना लोणावळा येथून अटक करण्यात आली.
- 3 जुलै: आरोपी सुनिल याला अटक करण्यात आली.
गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी फरार आहे.
प्रेमसंबंध:
अमीर आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या निकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांचे कुटुंब वीस वर्षांपासून शेजारी राहत होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात सलोखा होता. मात्र, दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये मोठी दरी निर्माण झाली होती.
पोलिसांची कारवाई:
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त सचिन हिरे, एमआयडीसी भोसरीचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, राजू जाधव, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहूल लोखंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रविण मुळुक, नितिन खेसे, विशाल काळे, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
७/१०/२०२४ ११:१७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: