सोयगाव शहराला दूषित पाणीपुरवठा, नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

 




दिलीप शिंदे 

सोयगाव : वेताळवाडी धरणातून शहराला मंगळवारी पिवळसर रंगाचा दूषित व शेवाळ युक्त पिण्याच्या पाणी पुरवठा झाल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान नगर पंचायतच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू असून याकडे नगरपंचायत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे 

     शहराला वेताळवाडी धरणातून  साठवण टाकीद्वारे पाणी पुरवठा होतो परंतु मंगळवारी थेट धरणातूननळद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे शहरातील घराघरात शेवाळ युक्त व पिवळसर रंगाचा दूषित पाणी पुरवठा झाला आहे त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने नागरिकांनी अन्य वापरासाठी या पाण्याचा उपयोग केला आहे त्यामुळे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे वेताळवाडी धरणावर सोयगाव नगरपंचायतची पाणीपुरवठा यंत्रणा आहे परंतु या पाणीपुरवठा यंत्रणेद्वारे पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून संबंधित पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना चक्क रंगीबेरंगी पाण्याचा पुरवठा झाला आहे 

दहा दिवसांआड पाणी पुरवठा
शहरातील भागांना मंगळवारी पाण्याचा पुरवठा झाला यातील काही भागांत दहा दिवसांच्या आड तर काही भागांना पाच दिवसांचा आड पिण्याच्या पाणी पुरवठा झालेला आहे धरणात मुबलक पाण्याचा साठा असूनही नगर पंचायतच्या मनमानी कारभारामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शहरात झालेल्या पिवळसर आणि शेवाळ युक्त पाणी पुरवठा मुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे सदर पुरवठा झालेल्या पाण्याचे नमुने तालुका आरोग्य विभागाने तपासणीसाठी घ्यावे व शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे...
सोयगाव शहराला दूषित पाणीपुरवठा, नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.. सोयगाव शहराला दूषित पाणीपुरवठा,  नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.. Reviewed by ANN news network on ७/०३/२०२४ ०९:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".