पत्नीला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पतिराजांची लगबग!

 


दाखले मिळविण्यासाठी जावयांच्या सासुरवाडीला चकरा!!

दिलीप शिंदे 

सोयगाव  : शासनाच्या लाडकी बहीण योजनेला जन्मदाखला व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्याने पत्नीचा जन्मदाखला व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक जावई सासुरवाडीला चकरा मारू लागले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात धावपळीचे चित्र आहे.

      शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणली त्यासाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या अध्यादेशात लाभार्थी महिलेला शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रासह जन्माचा दाखला अनिवार्य केला आहे. त्यामुळे पत्नीच्या जन्मदाखल्यासाठी सर्वच जावई सासुरवाडीत दाखल झाले आहेत. योजनेसाठी दुसऱ्या दिवशीही पोर्टल वरील नारीशक्ती दूत अ‍ॅप सुरू न झाल्याने ऑनलाइन एकही अर्ज स्वीकारण्यात आला नव्हता योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका,मदतनीस महा ई सेवा केंद्र, व ग्रामपंचायत स्तरावर पोर्टलवर लिंक देण्यात येणार होती तर अंगणवाडी सेविकांना नारीशक्ती दूत अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सूचना दिल्या होत्या. परंतु सदर अ‍ॅप अद्यापही सुरूच झाले नव्हते. त्यामुळे, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज भरण्यात आलेला नव्हता. दरम्यान मंगळवारी या अ‍ॅपवर पुन्हा सुधारणा करण्यासाठी काम सुरू आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अंगणवाडी सेविकांचे अ‍ॅप ऍक्टिव्हेट होतील असे प्रकल्प अधिकारी दीपक मेहेत्रे यांनी सांगितले. दरम्यान अ‍ॅप सुरू होत नसल्यास अंगणवाडी सेविकांना, ग्रामपंचायतीला अर्ज पुरविण्यात आले आहेत. हे अर्ज भरून संबंधित तालुकास्तरावरील महिला, बालविकास कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रकल्प अधिकारी दीपक मेहेत्रे यांनी सांगितले 

या योजनेत २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांच्या खात्यात १५०० रूपये वर्ग होणार आहेत. त्यासाठी वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला व शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या नवीन अध्यादेशामुळे मात्र महिलांची धावपळ उडाली आहे...


लाडकी बहीण योजनेसाठी गावस्तरावर अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र आणि ग्रामपंचायतीला अर्ज स्वीकारण्याची सूचना दिल्या आहेत. जन्मदाखला व शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. पुन्हा सुधारित आदेश आल्यास त्या प्रमाणे कागदपत्रे द्यावी लागतील अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात सर्व अंगणवाडी सेविकांना  अर्ज दिलेले आहेत. गावात फिरून हे ऑफलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले असून रात्री उशीरा अ‍ॅप सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांनी धावपळ करू नये काही अडचणी असल्यास तालुका महिला, बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा

     - दीपक मेहेत्रे, प्रकल्प अधिकारी बालविकास

पत्नीला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पतिराजांची लगबग! पत्नीला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पतिराजांची लगबग! Reviewed by ANN news network on ७/०३/२०२४ ०९:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".