शनिवारी 'विष्णवे अर्पणम' कार्यक्रम

 


भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत  'विष्णवे अर्पणम'  हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात कुचिपुडी नृत्यातून पारंपरिक रचना सादर केल्या जाणार आहेत.हे एकल कुचिपुडी नृत्य नाशिकच्या वैदेही कुलकर्णी सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे निवेदन शोभा सुपेकर करणार आहेत. 

हा कार्यक्रम शनिवार,दि.६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.रसिकांना तो विनामूल्य खुला आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१७ वा कार्यक्रम  आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे  दिली  आहे.


शनिवारी 'विष्णवे अर्पणम' कार्यक्रम शनिवारी  'विष्णवे अर्पणम' कार्यक्रम Reviewed by ANN news network on ७/०३/२०२४ ११:५०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".