प्राधिकरणातील कॅफेमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल

निगडी : कॉफी शॉपमध्ये अंधाऱ्या खोलीत मुला-मुलींना बसण्यासाठी आणि अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने निगडी प्राधिकरणातील कॅफे टाईम या कॉफी शॉपवर पोलिसांनी शनिवारी (दि. 27) दुपारी कारवाई करत चालकावर गुन्हा दाखल केला आहे. .

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चैतन्य सुभाष रेगडे (वय 23, रा. कासारवाडी) असे आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कॉफी शॉप चालवण्याचा कुठलाही परवाना नसताना त्याने कॅफे टाईम हे कॉफी शॉप सुरू केले होते. येथे कोणतेही खाद्यपदार्थ विक्रीसाठी न ठेवता, वरच्या मजल्यावर अंधाऱ्या खोलीत लाकडी प्लायवूडचे कंपार्टमेंट बनवून त्याला बाहेरून पडदे लावले होते. आतमध्ये सोफे ठेवून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. सध्या, निगडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

प्राधिकरणातील कॅफेमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल प्राधिकरणातील कॅफेमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ७/२९/२०२४ ०४:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".