मुंबई: भारतीय पोलीस सेवेत वरिष्ठ अधिकारी स्तरावर मोठे फेरबदल झाले आहेत. गृह विभागाचे सहसचिव व व्यंकटेश भट यांनी दिलेल्या आदेशानुसार, 10 वरिष्ठ IPS अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अपर पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक पदावरील अधिकार्यांचा समावेश आहे. तसेच राज्य पोलीस सेवेतील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
अपर पोलीस महासंचालक पदावरील बदल्या:
सुनील रामानंद: पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथील अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची राज्याच्या अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय पदावर बदली करण्यात आली आहे. हे पद रिक्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा अतिरिक्त पदभार घेतला होता.
दीपक पांडे: सुनील रामानंद यांच्या जागी महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील अपर पोलीस महासंचालक दीपक पांडे यांची बदली झाली आहे.
प्रवीण साळुंखे: अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) प्रवीण साळुंखे यांची बदली अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) पदावर करण्यात आली आहे.
सुरेश मेखला: नियत्रंण वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील सुरेश मेखला यांची अपर पोलीस महासंचालक, वाहतूक पदावर बदली झाली आहे.
अमिताभ गुप्ता: राज्याचे कारागृह व सुधार सेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक विशेष कृती येथे बदली झाली आहे.
पोलीस महानिरीक्षक पदावरील बदल्या:
सुहास वारके: विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली.
अश्वती दोरजे: पोलीस सह आयुक्त, नागपूर शहर येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली.
छेरिंग दोरजे: विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली.
रंजन कुमार शर्मा: विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून पोलीस सह आयुक्त, पुणे शहर येथे बदली.
डी के पाटील-भुजबळ: विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर येथे बदली.
राज्य पोलीस सेवेतील बदल्या:
अनिल बाबुराव शेवाळे: अपर पोलीस अधीक्षक, एटप, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर येथून पोलीस उपाधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे येथे बदली.
धन्यकुमार चांगदेव गोडसे: पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण येथून सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे बदली.
दादाहरी केशव चौरे: सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई येथून उपविभागीय पोलीस अधिकारी, परतुर येथे बदली.
विजय तुकाराम पाटील: पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर येथून उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण येथे बदली.
मनोहर नरसप्पा पाटील: पोलीस उपाधीक्षक, मुख्यालय, यवतमाळ येथून पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर येथे बदली.
सुधाकर चंद्रभान सुराडकर: अपर पोलीस अधीक्षक, एटप, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथून सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक शहर येथे बदली.
सोहेल नूरमोहम्मद शेख: उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर यांची बदली. त्यांचे पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत.
सविता मारुती गर्जे: उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण यांची बदली, त्यांचे पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
७/०९/२०२४ ११:०१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: