धर्माबाद : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी धर्माबाद येथील दैनिक प्राप्ती टाइम्सचे मुख्य संपादक पी. जी. कोटुरवार यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथील सध्या स्थायिक असलेले कोटुरवार हे दैनिक प्राप्ती टाइम्सचे मुख्य संपादक आहेत. ते दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचलप्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधा कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०८/२०२४ १०:३८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: