रेल्वेमध्ये भरली जाणार १३ हजार रेल्वेचालकांची पदे

अलिकडे  रेल्वे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. रेल्वेचालक (लोको पायलट) आणि असिस्टंट लोको पायलट यांची कमतरता हे एक यामागील प्रमुख कारण असल्याचे लक्षात आल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय रेल्वेने 5,696 पदांसाठी असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या रिक्त जागा जाहीर केल्या होत्या. परंतु, रेल्वेमध्ये लोको पायलटची तीव्र कमतरता लक्षात घेता ही संख्या अपुरी होती. या कमतरतेमुळे बालासोर दुर्घटना आणि अलीकडेच झालेला कांचनजंगा एक्स्प्रेस अपघात यासारखे अनेक दुर्दैवी अपघातही घडले. कर्मचाऱ्यांची कमतरता हे या घटनांचे प्रमुख कारण ठरले.

हे अपघात आणि समस्या लक्षात घेता, रेल्वेने आता 13,000 नवीन असिस्टंट लोको पायलट (ALP) रिक्त पदांना परवानगी दिली आहे. पहिल्या 5,696 पदांची संख्या आता 18,792 झाली आहे. ही वाढ विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल आणि रेल्वेतील लोको पायलटची कमतरता भरून काढेल.

रेल्वेमध्ये लोको पायलटची नोकरी खूप आव्हानात्मक असते. त्यांना बरेच तास काम करावे लागते. खरेतर त्यांना आठवड्यातून फक्त 40 तास काम करण्याची परवानगी आहे.परंतु  त्यांना सरासरी 60-70 तास काम करावे लागते,सध्या आणि त्यांच्या विश्रांतीचा वेळही कमी केला जातो.थकवा आणि एकाग्रतेचा अभाव यामुळे चुका होऊ शकतात म्हणून या अतिकामामुळे कधीकधी अपघात होतात.

महिला असिस्टंट लोको पायलटनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. इंजिनमध्ये महिलांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. शिवाय, रेल्वे इंजिनमध्ये उष्णता जास्त असते आणि एसी सुविधा नीट काम करत नाहीत, त्यामुळे काम करणे कठीण होते.

या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकारने नवीन लोको पायलटची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा आणि रेल्वे सुरक्षित करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुरक्षेचे प्रमाण सुधारेल. यासोबतच महिला लोको पायलटच्या सुविधांमध्येही सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना कोणतीही गैरसोय न होता कर्तव्य बजावता येईल.

हे पाऊल रेल्वेच्या भवितव्यासाठी सकारात्मक ठरेल आणि प्रवाशांची सुरक्षा आणि सेवा गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल.


रेल्वेमध्ये भरली जाणार १३ हजार रेल्वेचालकांची पदे रेल्वेमध्ये भरली जाणार १३ हजार रेल्वेचालकांची पदे Reviewed by ANN news network on ६/२१/२०२४ ०४:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".