रायगडावर विवेकानंद केंद्राच्या युवा नेतृत्व विकसन उपक्रमाचा प्रारंभ


प्लास्टिक कचरासंकलन, पुस्तक, भित्तीपत्रकाचे प्रकाशन 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या जयघोषात   दुर्ग दुर्गेश्वर श्री रायगडावर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताच्या युवा नेतृत्व विकसन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३४० युवक - युवतींनी गडावर चढाई करतानाच प्लास्टिक कचरा गोळा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात राष्ट्रसेवेसह वैयक्तिक संकल्प केले. यावेळी उपक्रमासाठीच्या पुस्तकाचे व भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. रविवार,दि.२३ जून रोजी  दुपारी हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी केंद्राचे प्रांत सहसंघटक सुमीत शिवहरे, निधी संकलन प्रमुख संजय कुलकर्णी, कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  देवगिरी विभाग युवाप्रमुख लखन अवस्थी यांनी प्रास्ताविक केले. वैदेही पाठक हिने' शिवदुर्गेच्या दूतांची' हे गीत गायिले. चित्रा सेनगावकर हिने विवेकवाणी म्हटली. केंद्र प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.  

गेल्या २९ वर्षांपासून विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांताकडून महाविद्यालयीन युवक - युवतींच्या व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकसनासाठी युवा नेतृत्व विकसन उपक्रम राबविण्यात येत आहे.जुलै ते डिसेंबर दरम्यान उपक्रम प्रक्रिया चालणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यंदा युवा नेतृत्व विकसन उपक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर लिखित अष्टावधानी शिवराय या पुस्तकावर आधारीत परीक्षा घेण्यात येणार आहे. या पुस्तकासह भित्तिपत्रकाचे  केंद्राच्या प्रांत संघटक सुजाता दळवी, प्रांत युवाप्रमुख सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन 

युवा नेतृत्व विकसन उपक्रमाची प्रक्रिया जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान सुरु राहणार आहे.वरिष्ठ महाविद्यालयीन युवक - युवतींसाठी अष्टावधानी शिवराय या पुस्तकावर आधारीत परीक्षा, एकदिवसीय स्थानिक शिबिर, दर रविवारी स्वाध्याय व सेवाकार्याची संधी आणि विभागीय शिबिरासाठी निवड अशी प्रक्रिया आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.   


युवक - युवतींसाठी संधी 

● जीवन कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करण्याची संधी

● स्थानिक पातळीवर एकदिवसीय युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी

● दर रविवारी चालणार्‍या स्वाध्यायमधून शारीरिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकास 

● महाविद्यालयीन स्थानी नेतृत्व करण्याची संधी

● देशभक्ती, सेवा, साहस व बौद्धिक यावर आधारित उपक्रमात सहभागाची संधी 

● विभाग पातळीवर होणार्‍या तीनदिवसीय युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी

● उपक्रमात सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्र

रायगडावर विवेकानंद केंद्राच्या युवा नेतृत्व विकसन उपक्रमाचा प्रारंभ  रायगडावर विवेकानंद केंद्राच्या युवा नेतृत्व विकसन उपक्रमाचा प्रारंभ  Reviewed by ANN news network on ६/२५/२०२४ ११:४६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".