व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्‍या रत्नागिरीतील दोघांना पुण्यात अटक

 


पुणे : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्‍या दोघांना २२ जून रोजी पुण्यातील बावधन परिसरात असलेल्या एका हॉटेल नजिक वनविभागाने अटक केली. अटक करण्यात आलेले दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून सव्वातीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

किशोर यशवंत डांगे (वय 45) व संदीप शिवराम कासार (वय 62) दोघे (रा,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. या संदर्भात वनरक्षक सारिका दराडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर डांगे हा वाहनचालक आहे. तर, संदीप कासार हा शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिक आहे.या दोघांनाही बावधन परिसरातील रानवारा हॉटेलसमोरून अटक करण्यात आली.

व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्‍या रत्नागिरीतील दोघांना पुण्यात अटक व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्‍या रत्नागिरीतील दोघांना पुण्यात अटक Reviewed by ANN news network on ६/२५/२०२४ ०८:३६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".