'हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग इंडस्ट्री समिट' ला प्रारंभ

 


ग्राहकांना द्या सुरक्षित खाद्यानुभव ! :प्रमोद दहीतुले

पुणे : पुणे डिस्ट्रिक्ट केटरिंग असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट अँड इंडस्ट्रियल केटरर्स च्या वतीने  आयोजित 'हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग इंडस्ट्री समिट २०२४' या दोन दिवसीय  परिषदेचे  उद्घाटन शनिवारी ,२४ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता झाले. भारतीय अन्न आणि  सुरक्षा मानक प्राधिकरणाचे  विभागीय संचालक (एफएसएसएआयप्रमोद दहीतुले  , रूपा कानविंदे, पूना गेस्ट हाउस चे किशोर सरपोतदार, सुमेर सिंग, बिंद्रा हॉास्पिटॅलिटी केटरिंग चे प्रमुख जी.एस.बिंद्रा, पुणे डिस्ट्रिक्ट केटरिंग असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश माळी आदि मान्यवर उपस्थित होते. २४ जून २०२४ रोजी दुपारी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि २५ जून रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत  ही परिषद शुभारंभ लॉन,डी.पी.रस्ता,म्हात्रे पूल येथे आयोजित करण्यात आली आहे.प्रियांका सूर्यवंशी यानी परिषदेच्या पहिल्या दिवशी  मुख्य मार्गदर्शन केले.

हॉस्पिटॅलिटी,केटरिंग व्यवसायातील आवश्यक सरकारी परवानग्या,नियम,उद्योजकता मार्गदर्शन आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली.पुणे डिस्ट्रिक्ट केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी  यांनी स्वागत केले.फॉस्टाग ट्रेनिंग (फूड सेफ्टी ट्रेनिंग अॅन्ड सर्टीफिकेशन) हे प्रशिक्षण घेतलेली किमान एक व्यक्ती प्रत्येक व्यवसायात असली पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले. सुपरवायजर ट्रेनिंग पहिल्या दिवशी पार पडले.त्यात दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री, मांस, मासळी, तेल, पॅकेज्ड वॉटर, बेकरी, स्ट्रीट फूड, केटरिंग, स्टोरेज , उत्पादन , वाहतूक याबाबत माहिती देण्यात आली.
 
प्रमोद दहीतुले म्हणाले, ' सर्वांच्या आरोग्यासाठी खाद्य सुरक्षा ही महत्वाची आहे.ग्राहकांना आपण सुरक्षित खाद्यानुभव दिला पाहिजे.प्रशिक्षणातून  हेल्थ हायजिन शिकणे आवश्यक आहे. आताचे ग्राहक जागरूक आहेत. त्यांना पदार्थ तयार होताना देखील पाहायचे असते.प्रक्रिया पाहायची असते. ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. गरम पदार्थ गरम देणे, थंड पदार्थ थंड ठेवणे हे  मुख्य सूत्र आहे. या क्षेत्रात सतत शिकत राहणे, आवश्यक परवाने असणे, लेखा परीक्षण करणे महत्वाचे आहे.केटरिंग व्यवसायातील व्यक्ती एकत्र येऊन प्रशिक्षित होणे  अभूतपूर्व घटना आहे. त्यातून प्रशिक्षित मनुष्यबळ  तयार होईल. आणि हे क्षेत्र पुढे जाईल.

सुरेश माळी म्हणाले,'पुणे ही अतिथ्यशीलतेची राजधानी आहे. हा लौकिक सर्वांनी जपावा. सर्व सरकारी पातळयावर केटरिंग व्यावसायिकांचे प्रश्न सोडवले जातील.केटरिंग व्यवसायाच्या अडचणी असंघटितपणामुळे आहेत. या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल'.
'हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग इंडस्ट्री समिट' ला प्रारंभ 'हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग इंडस्ट्री समिट' ला प्रारंभ Reviewed by ANN news network on ६/२५/२०२४ ०८:१६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".