पुणे : पिंपरी चिंचवड मधील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका यांना नुकतेच नाशिक येथे राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारत विकास प्रबोधिनी, शांतिदूत एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक विजय इंगळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
डॉक्टर स्मिता सातारकर इंग्रजी विषयाच्या नामांकित शिक्षिका असून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही त्या जगभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.
त्यांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास डॉक्टर उज्वला, विजय इंगळे, मेसेज इंडिया विजेत्या सुमेधा तिळवणकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टर स्मिता सातारकर यांनी सर्वांचे आभार मानले व या पुरस्काराचे खरे मानकरी त्यांचे विद्यार्थी आहेत असे सांगितले. इंग्रजी भाषा शिकवताना जो आनंद मला मिळतो त्या आनंदात उद्याच्या भारताची प्रगती सामावलेली आहे याचा मला जास्त आनंद असतो त्यामुळे हा पुरस्कार माझ्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारा आहे पुढे जाऊन मी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचे ज्ञान त्यांना मिळवून देण्यासाठी कुठलेही शुल्क न घेता नक्की प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: