पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे तहसीलदार कचेरीपासून हाकेच्या अंतरावर संविधान चौक येथे तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी शिगांनी प्रहार करत हल्ला चढविला. काचा फोडल्यानंतर चालकाच्या अंगावर मिरची पूड फेकून वाहन अडविण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे. चालक व तहसीलदार दोघेही बचावले आहेत. वाहनाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना एमएच ४२ एएक्स १६६१ क्रमांकाच्या सरकारी वाहनातून घेऊन वाहनचालक मल्हारी मखरे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संविधान चौकात पोहोचले. गाडी तहसीलदार कार्यालयाकडे निघाली असता तेथे आलेल्या एका कारमधून तीन ते चार हल्लेखोर हातात लोखंडी शिगा घेऊन खाली उतरले. त्यांनी तहसीलदारांचे चालक मखरे यांच्या अंगावर मिरचीपूड टाकली. आणि हातील शिगांनी तहसीलदारांच्या वाहनाची तोडफोड केली. मात्र, मखरे यांच्या प्रसंगावधानामुळे तहसीलदार आणि ते स्वतः या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले.
भरचौकात, रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्याने इंदापूरमध्ये एकच खळबळ माजली आहे.
अपडेट
सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे या प्रमुख नेत्यांसह अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा. त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.
-----------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: