विठ्ठल ममताबादे
उरण : जालना जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार खासदार केंद्रीय रेल्वेमंत्री व खनिज आणि कोळसा मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना रायगड जिल्हा सरचिटणीस सुदेश पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
सुदेश पाटील यांचा वाढदिवस असल्यामुळे रावसाहेब दानवे पाटील यांनी सुदेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रचाराची धावपळ सुरू असुन सुद्धा प्रेमापोटी रावसाहेब दानवे यांनी त्यांचा बहुमुल्य वेळ आम्हाला दिला.याचा मला आनंद आहे. असे सुदेश पाटील यांनी मत व्यक्त केले.
ह्या प्रसंगी आमदार संतोष दानवे,सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील,मित्रपरिवार, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुदेश पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सदिच्छा भेट
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२४ ०८:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: