पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे या दोघांनी पिंपरी चिंचवड शहरातील मतदानकेंद्रात मतदान केले.
बारणे यांनी थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दक्षिण उत्तर इमारत, तळमजला, दक्षिणेकडून खोली नंबर तीन (बूथ नं 218) या मतदान केंद्रात मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा हे कुटुंबीय होते.
संजोग वाघेरे यांनी पिंपरी वाघेरे, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय तळ मतदान केंद्र 310, खोली क्र. 3 या मतदान केंद्रावर मतदान केले. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश हे होते.
मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे यांनी केले मतदान
Reviewed by ANN news network
on
५/१३/२०२४ ११:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: