पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते अजनी दरम्यान अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली.
या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक 01167 पुणे - अजनी एकेरी उन्हाळी विशेष दिनांक 02.5.2024 रोजी पुण्याहून 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.30 वाजता अजनीला पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, बडनेरा आणि वर्धा
रचना: 13 AC-3 टियर + एक स्लीपर क्लास + चार जनरल सेकंड क्लास + एक जनरेटर व्हॅन + एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन = एकूण 20 LHB कोच.
आरक्षण: गाडी क्रमांक 01167 साठी बुकिंग दिनांक 01.5.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडले जाईल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि या गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०१/२०२४ १०:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: