पत्रक खरे की खोटे नागरिकात संभ्रम
पिंपरी : लोकसभेच्या १३ मे रोजी होणार्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात 'जमियत उलेमा ए हिंद' या संघटनेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे.
या बाबतचे एक जाहिरातवजा प्रसिद्धीपत्रक सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार 'जमियत उलेमा ए हिंद' ने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, पुण्यामध्ये रविंद्र धंगेकर आणि मावळमध्ये संजोग वाघेरे यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे.
या पत्रकावर जमियत उलेमाचे पुणे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मुहम्मद शाहीद कास्मी आणि पुणे शहराध्यक्ष मौलाना अबरार अहमद कास्मी यांची नावे असून त्यांचे मोबाईल नंबरही आहेत. जाहिरात प्रकाशक, मुद्रक, छापलेल्या प्रतींची संख्या यांचा उल्लेख दिसून येत नाही.
जर हे पत्रक खरोखरच जमियतच्या पदाधिकार्यांनी जारी केले असेल तर त्याचामोठा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो. आणि जर त्यांनी जारी केले नसेल तर या सर्व प्रकरणावर कायदेशीर कारवाई संभवते.
Reviewed by ANN news network
on
५/०१/२०२४ १२:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: