मृतांचा आकडा वाढला
मुंबई : मुंबईतील घाटकोपर, पंतनगर भागात काल १३ मे रोजी एक महाकाय होर्डिंग पेट्रोलपंपावर कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा सुमारे १४ वर गेला असून ५९ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.या प्रकरणी होर्डिंगमालक कंपनी आणि रेल्वेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलीसठाण्यात होर्डिंग मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध ३५३/२०२४ क्रमांकाने आणि भारतीय दंडविधान कलम ३०४,३३८,३३७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होर्डिंग ४० बाय ४० फूट आकाराचे असावे असा दंडक आहे. मात्रे हे होर्डिंग १०० बाय १२० एव्हढ्या मोठ्या आकाराचे होते. महापालिकेने होर्डिंगमालकाला यापूर्वीच नोटीस पाठविली होती असे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: