खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीनजिक बोरघाटामध्ये १० मे रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास तीन वाहने एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ गंभीर झखमी झाले. मृतांची ओळख हे वृत्त हाती येईपर्यंत पटलेली नव्हती.
जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार खोपोली जवळ बोरघाटात पुणे मुंबई मार्गिकेवर भरधाव जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात तिघे जागीच ठार झाले.आणि आठ गंभीर जखमी झाले. अपघातामुले वाहतूक कोंडी झाली.
अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले.वाहतूक सुरळीत केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: