अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

 

 मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत.

महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे.

ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे. आयुष्याला निरर्थक मानून व्यसनाधीन झालेल्या सिद्धार्थची नेमकी काय रहस्यमय गोष्ट आहे, ते रंगीत चित्रपटात पाहता येणार आहे.

“आज ओटीटी माध्यम लहानांपासून मोठ्यांपर्यंत घराघरात पोहचत आहे. अल्ट्रा झकास सारख्या मोठ्या ओटीटीवर माझे सलग चार चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.” असे अभिनेता भूषण प्रधानने व्यक्त केले.

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार Reviewed by ANN news network on ५/२२/२०२४ ०१:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".