नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना अंतरीम जामीन मंजूर झाला असल्याचे वृत्त आहे.
केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला. अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. केजरीवाल यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता यावा यासाठी हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयाने त्यांना २ जून रोजी पुन्हा तुरुंगात हजर होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली. सध्या ते तिहार तुरुंगात असून न्यायालयीन कोठडीत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ७ मे रोजी केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, अंतरिम जामीन मंजूर झाल्यास अरविंद केजरीवाल यांनी कोणतीही कार्यालयीन जबाबदारी पार पाडणे टाळावे. त्याच दिवशी दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली होती.
Reviewed by ANN news network
on
५/१०/२०२४ ०३:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: