पिंपरी : पुणे जिल्ह्यात उद्या १३ मे रोजी मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी आज १२ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान कर्मचार्यांना मतदान साहित्याचे वाटप सुरू झाले.
पनवेल विधानसभा मतदासंघाकरीता ए. आर. कासेकर पॉलिटेक्नीक कॉलेज, ठाणा नाका रस्त्याजवळ, कर्नाळा स्पोर्टस् ॲकेडेमीच्या समोर, पनवेल जि. रायगड, कर्जत विधानसभा मतदारसंघाकरीता पोलीस मैदान, प्रशासकीय इमारतीजवळ, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघाकरीता डी.बी. पाटील मंगल कार्यालय, जसई, ता. उरण, जि. रायगड, मावळ विधानसभा मतदारसंघाकरीता नूतन अभियांत्रिकी कॉलेज, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ, स्वर्गीय शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाकरीता ऑटो क्लस्टर आणि रिसर्च सेंटर, चिंचवड येथून साहित्याचे वितरण सुरू झाले आहे.
मतदान कर्मचार्यांना मतदानकेंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसेसचा वापर केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: