भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'संगीत रामदासायन' या सांगीतिक कार् यक्रमाचे आयोजन दि.१८ मे २०२४ रोजी करण्यात आले आहे.श्री समर्थ रामदासांचे जीवनकाव्य या कार्यक्रमातून सादर केले जाणा र आहे. काव्य लेखन श्रीमती प्रतिभाताई गारटकर यांचे असून पराग पांडव हे सादरकर्ते आहेत.पवन त्रिभुवन आणि विद्यार्थिनी नृत्य सादर करणार आहेत.श्रद्धा कानिटकर (कीबोर्ड),गणेश तानवडे(तबला),चैतन्य भालेराव (तालवाद्य),अदिती गराडे,नचिकेत हरिदास (हार्मोनियम),ज्ञानेश कोकाटे(पखवाज) हे साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार, दि.१८ मे २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०८ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
१८ मे रोजी 'संगीत रामदासायन ' कार्यक्रम
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२४ ११:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: