पुणे विभागाचा एक कर्मचारी पुरस्कृत
पुणे : मध् रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरन यादव यांनी १४ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी १-१ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सत्कार केला.
याविषयी माहिती देताना पुणे येथील रेल्वेचे जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी सांगितले की,
ड्युटी दरम्यान कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान, अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान या बद्दल हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दोन हजार रुपये रोख असे आहे.
पुणे विभागातील जगदीश मारुती, गँगमन, भिलवडी यांना २६ मार्च रोजी कामाच्या दरम्यान विना गार्ड जाणाऱ्या मालगाडीच्या ब्रेक व्हॅनमधून एक विचित्र आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ स्टेशन मॅनेजर, भिलवडी यांना कळवले. किर्लोस्करवाडी स्थानकावर मालगाडी थांबवण्यात आली आणि ब्रेक व्हॅन सेवेतून बाहेर काढण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला.
महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
चित्तरंजन स्वैन, अप्पर महाव्यवस्थापक, एम एस उप्पल, मुख्य संरक्षा अधिकारी, एस एस गुप्ता, मुख्य परिचालन व्यवस्थापक, राजेश अरोरा, मुख्य अभियंता, सुनील कुमार, प्रमुख्य यांत्रिक अभियंता, एन. पी. सिंग, मुख्य विद्युत अभियंता यावेळी उपस्थित होते.
मध्यरेल्वेच्या १४ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: