बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत कारखाली दुचाकीवरील दोघांना चिरडले!; दोघांचाही जागीच मृत्यू (VIDEO)
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १८ मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालक तरुणाने दुचाकीवरून घरी जात असलेल्या एक तरुण आणि तरुणीला चिरडले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद कारचालक पुणे परिसरातील नामांकित ब्रह्मा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीचे मालक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल असून तो विनानंबरप्लेटची गाडी दारूच्या नशेत चालवत होता.
अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा अशी मृत तरुण तरुणीची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीसठाण्यात अकिब रमजान मुल्ला याने तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकिब मुल्ला,अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा हे बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर ते विमानतळ रस्त्यावर करड्यारंगाच्या एका नंबरप्लेट नसलेल्या कारने अनिश आणि अश्विनी यांच्या स्कुटरला मागून जोरदार धडक देत त्या दोघांना कारखाली चिरडले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर तेथे गोळा झालेल्या संतप्त जमावाने वेदांत अगरवाल नशेत धुंद असल्याचे पाहून त्याला चांगलाच चोप दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: