पुणे : पुण्यातील कल्याणीनगर 'हिट अॅन्ड रन' प्रकरण रोज नएवे वळण घेताना दिसत आहे. काल २३ मे रोजी सोशल मीडियावर एक तरुण अर्वाच्य शिवीगाळ करताना आणि एक रॅप साँग गातानाचा व्हिडिओ वायरल झाला. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा पुण्यातील नागरिकांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या.
देशभरातील बहुतेक आघाडीच्या वाहिन्यांनी 'हिट अॅन्ड रन' प्रकरणातील 'त्या' मुलाचा हा प्रताप असल्याचे म्हटले.दरम्यान आज त्याच्या आईने व्हिडिओतील मुलगा दुसराच कोणीतरी असून तो आपला मुलगा नाही असे सांगत. विनाकारण गैरसमज पसरवू नका असे आवाहन केले आहे.
दरम्यान सहानुभूती मिळविण्यासाठी हा करण्यात आलेला स्टंट आहे अशी चर्चा आता पुणेकरांमध्ये सुरू झाली आहे. या व्हिडिओमुळे नागरिकात तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी होऊ लागली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, आज सोशल मीडिया आणि काही चॅनल्स वर पोर्श कार दुर्घटनेतील आरोपीचा जमीन मिळाल्यानंतरचा एक रॅप सॉंग व्हिडिओ व्हायरल होतं असून सदर गाण्याची सत्यता तपासणे गरजेचे आहे. जर हे रॅप सॉंग त्या मुलानेच केलेले असेल तर हा सर्वांच्याच जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून याबाबत कठोर कारवाई व्हावी.त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन याबाबत त्वरित खुलासा करावा.तसेच अग्रवाल कुटुंबातील व्यक्तीने पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
या दोन्हीमुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक होत असून याबाबत त्वरित खुलासा वा कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
ज्या मुलाचा व्हिडिओ वेदांत अग्रवाल च्या नावाने व्हायरल होत आहे. तो एक कंटेंट क्रियेटर आहे. त्याचे खरे नाव आर्यन असे आहे. तो "Cringistaan " नावाने युट्युब चॅनेल चालवतो. त्याच्या instagram आयडी चे नाव पण "Cringistaan 2" आहे. अशी माहिती एक्स या सोशल मीडियावरील नम्रता उईके या हँडलवरून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस आता या प्रकरणाचा छडा लावून व्हिडिओत दिसणार्या तरुणावर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या मुलाचा व्हिडिओ वेदांत अग्रवाल च्या नावाने व्हायरल होत आहे. तो एक कंटेंट क्रियेटर आहे. त्याचे खरे नाव आर्यन असे आहे.
— Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』 (@Namrata_Uikey_) May 23, 2024
तो "Cringistaan " नावाने युट्युब चॅनेल चालवतो.
त्याच्या instagram आयडी चे नाव पण "Cringistaan 2" आहे. #vedant #porschelife #porsche #pune #VedantAgarwal pic.twitter.com/FCeWB3Takq

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: