धंगेकरांचा मोर्चा आता राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे!; दरमहा मिळणार्‍या हप्त्याची यादी वाचून दाखवत केले पुरते वस्त्रहरण!!

 पुणे : मागील आठवडाभर पोलिसांच्याविरोधात आघाडी उघडलेल्या कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आता आपला मोर्चा राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे वळविला आहे. त्यांनी आणि उबाठा शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी आज राज्य उत्पादन शूल्क खात्याच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे मोहन जोशी होते. या तिघांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना जाब विचारला. 

शहरात अवैध पब्ज वाढले असून या पब्जकडून दरमहा लाखो रुपयांचा हप्ता वसूल केला जात असल्याचा आरोप या तिघांनी केला. एव्हढेच नव्हे तर कोणत्या पबकडून दरमहा किती वसुली केली जाते याची यादीच त्यांनी अधिकार्‍यांना वाचून दाखविली. एव्हढेच नव्हे तर, आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला बेकायदा सुरू असलेले पब दाखवतो असे थेट आव्हानही राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकार्‍यांना दिले. सुमारे तासभर अधिकार्‍यांना धारेवर धरले. अधिकार्यांची परिस्थिती यामुळे केविलवाणी झाली.

आंदोलनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना हप्तेवसुलीचा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले. तसेच, कोठे अवैध बार, पब्ज सुरू असतील तर आपण त्याची चौकशी करून त्यांवर कारवाई करू असेही म्हटले आहे. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी काही आकडेवारी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार पब, बार, हॉटेल मालकावर गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गुन्हे दाखल झाले असून या वर्षी १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. वर्षभरात १०० पेक्षा जास्त बारवर कारवाई करण्यात आली आहे. दोन परवाने कायमस्वरुपी बंद केले असून ५४ बार सील केले आहेत.

मात्र, तरीही अधिकार्‍यांनी आंदोलकांचे आव्हान का स्वीकारले नाही हा प्रश्न पुणेकरांच्या मनात उभा राहिला आहे.

धंगेकरांचा मोर्चा आता राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे!; दरमहा मिळणार्‍या हप्त्याची यादी वाचून दाखवत केले पुरते वस्त्रहरण!! धंगेकरांचा मोर्चा आता राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे!; दरमहा मिळणार्‍या हप्त्याची यादी वाचून दाखवत केले पुरते वस्त्रहरण!! Reviewed by ANN news network on ५/२७/२०२४ ०४:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".