बोरीवली, नालासोपारा, विरार, पुणे येथून पोलिसांनी केली होती अटक
मुंबई : भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवत बोरीवली, नालासोपारा, विरार, पुणे परिसरात वास्तव्य करणार्या २० बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
१९ ऑक्टोबर २०२३ रोजी बोरीवली येथे तीन बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या हाती लागले होते. बोरीवली पोलिसांनी या तिघांची झाडाझडती घेतली असता अन्य १७ घुसखोरांची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन या घुसखोरांना ताब्यात घेतले.त्यांच्यावर किल्ला कोर्ट, आठव्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने २४ मे रोजी या प्रकरणात निकाल दिला. या २० जणांना प्रत्येकी ८ महिने कारावास व ४ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी १६ दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली. या शिवाय शिक्षा भोगल्यानंतर या घुसखोरांना त्यांच्या देशात पाठविले जाणार आहे.
सुमन मोमीन सरदार उर्फ विश्वजित बाटुल मंडल, सलमान अयुब खान उर्फ अब्दुलसलाम आयुब मोंडल, सैदुल सफरअली गामन, फिरोज उलहक मोल्ला, रॉनी शफीकुल शेख उर्फ रशीद उलइस्माम मोनीर होलादार, मसुद राणा इद्रीस गाझी, मोनीरुल मोहमद मुल्ला, मासुम बिल्ला अश्रफ मंडल, रब्बी कजल मंडल,ओमर फारुख मोल्ला, अतिकुल अकिलुद्दीन मुल्ला, मुस्ताक अली कुतुबुद्दीन तरबदार, रहिम मोईद्दीन मंडल उर्फ रहिमुद्दीन मुल्ला, इनामुल कमल सरदार, रिपोन रोमेन ढाली, आरीफ शौकत विश्वास, दिलावर इद्रीस गाझी, मुबीन जावेद मंडल उर्फ मुबीन सोईदुल इस्लाम, मिठू शोफीकुल शेख, सुजौन शरीफउल शेख अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाचा तपास करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक- गुन्हे प्रदीप काळे, सहायक निरीक्षक साळुंके, आरबूने, उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर,कल्याण पाटील व अंमलदार शेख, राणे, सावर्डेकर, घोलप, बाबर, गोसावी, थोरात, जाधव, कणसे सहाणे, केसरे, रेवाळे, गर्जे, पवार, बोरसे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
५/२६/२०२४ ०३:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: