महाळुंगे येथील कंपनीत चोरी करणारा मुद्देमालासह अटकेत!

 


पावणेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!!

पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ९ एप्रिल रोजी चिखली येथे एक टेम्पो अडवून त्यातून महाळुंगे एम. आय. डी. सी. तील कंपनीतून चोरलेले विदेशातून आयातीत रबरी पार्ट्स जप्त केले. प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.  आरोपीकडून टेम्पो आणि रबरी पार्ट्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याची किंमत सुमारे ६ लाख ७५ हजार रुपये आहे.

पोलीस उपायुक्त, गुन्हे संदीप डोईफ़ोडे यांनी ही माहिती दिली.

शफिक यासीन पठाण वय - ४९ वर्ष रा. निमगाव खंडोबा, ता.खेड जि.पुणे ासे अटक करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव असून त्याचा साथीदार  सनी भिवरकर याचा शोध सुरू आहे. या दोघांनी जयश्री पॉलीमर कंपनी, महाळुंगे एमआयडीसी,  पुणे येतून हे पार्ट्स चोरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी चिखली पोलीसठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एम.एच-१४ जेएल  ५०८४ क्रमांकाचा टेम्पो चोरीचा माल घेवुन चिखली येथे विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलीसपथक त्या परिसरात टेम्पोची वाट पहात दबा धरून बसले. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो येताच पोलिसांनी त्याला अडवून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या चोरी प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये   २२६ / २४  क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३८१,४०८,३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याने, आरोपीस मुद्देमालासह महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त  विनय कुमार चौबे, अपर  आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे,  सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सुनिल भदाणे, तसेच खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार निशांत काळे, शैलेश मगर, प्रदीप गायकवाड, भारत गाडे यांनी केली.


महाळुंगे येथील कंपनीत चोरी करणारा मुद्देमालासह अटकेत! महाळुंगे येथील कंपनीत चोरी करणारा मुद्देमालासह अटकेत! Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ ०४:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".