पाणी नाही, रस्ते नाहीत, रस्त्यावर लाईट नाही मग तीन पट कर का भरायचा? : ऋषिकेश कानवटे

  पुणे :   पुणे महानगरपालिकेने आपल्या हद्दीमध्ये नवीन 23 गावांचा समावेश केला मात्र त्या गावांना सोयी सुविधा देण्याबाबत महापालिकेचे कोणतेही धोरण कागदाबाहेर दिसत नाही मात्र महापालिका प्रशासन कर मात्र वसूल करते. तेही तीन पट कर वसूल केला जातोय. ज्यामध्ये स्वच्छता कर, पाणीपट्टी, रस्त्याचा कर, अशा वेगवेगळ्या सुविधांचा कर महापालिकेकडून वसूल केला जातो. परंतु महापालिकेने या समाविष्ट गावांमध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत का? याची चौकशी आयुक्तांनी करावी आणि त्यानंतर या नागरिकांकडून कर वसूल करण्यात यावा जर पाणी, रस्ता आणि स्ट्रीट लाईट, रस्ते सफाई यांसारख्या सुविधा जर आजपर्यंत या सर्व नागरिकांना मिळाल्या नसतील तर आपण त्यांच्याकडून वसूल करण्यात येणारा कर हा योग्य ठरतो का? की सर्वसामान्य माणसांना वेठीस धरून महानगरपालिका प्रशासन आपले खिसेभरू पाहतयळ असा सवाल रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक ऋषिकेश कानवटे  यांनी केला आहे.

कानवटे यांनी या प्रकरणी पालिकेच्या आयुक्तांना ई मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की,  सूस मधील महादेवनगर परिसरात आजही वेळेवर पाणी येत नाही, रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असतात, रस्ते नाहीत त्यामुळे रस्ते झाडण्याचा प्रश्नच येत नाही. मग आम्ही हा कर भरायचा का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो. नागरिकांना अशी वेठीस धरण्यामागे कोणाचा हात आहे हे देखील नागरिकांनी शोधणे गरजेचे आहे.
 
       याबाबत वेळोवेळी आपल्या सुस म्हाळुंगे परिसरातील प्रश्नांबाबत प्रशासनासोबत पत्र व्यवहार केला मात्र याबाबत प्रशासन उदासीन आहे हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे याबाबत योग्य ती कारवाई करून या गावांना लवकरात लवकर सुविधा देण्यात याव्या अन्यथा या गावातील एकही व्यक्ती कर भरणार नाही,

    त्याचबरोबरीने पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितेदादा पवार यांनी पुणे महानगरपालिकेला स्पष्ट शब्द सांगितले होते की तीन पट कर तात्काळ रद्द करण्यात यावा व जुन्या हद्दींना जो कर आकारला जातो तोच कर नवीन हद्द्यांना सुद्धा आकारण्यात यावा तरीदेखील बऱ्याच नागरिकांना तीन पट आणि जादा कर येत आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून जो शासन आदेश आहे तो अमलात आणावा अन्यथा आपणा विरुद्ध आंदोलन पुकारले जाईल.
पाणी नाही, रस्ते नाहीत, रस्त्यावर लाईट नाही मग तीन पट कर का भरायचा? : ऋषिकेश कानवटे पाणी नाही, रस्ते नाहीत, रस्त्यावर लाईट नाही मग तीन पट कर का भरायचा? : ऋषिकेश कानवटे Reviewed by ANN news network on ४/०२/२०२४ १०:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".