लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, मंगळवार (दि. 2) सकाळी कार्ला गडावर जाऊन कुलस्वामिनी आई एकविरेचे दर्शन घेतले. मनोभावे माथा टेकवून एकविरेचे मातेचे आशिर्वाद घेऊन त्यांनी मावळ तालुक्यातील प्रचार दौ-याला सुरुवात केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष गौतम चाबुकस्वार, मारुती आडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ पडवळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिलाध्यक्षा रत्नमाला कारंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महिलाध्यक्षा शैलजाताई खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देहूरोड शहराध्यक्ष हाजीमलंग मरियत्तू, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष भरत नायडू, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिकेत घुले, युवासेना तालुका अध्यक्ष उमेश गावडे, सुरेश गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक भरत ठाकूर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक दत्ता (नाना) पवळे, शांताराम भोते, शिवसेना नेते विकेश मून्या, मावळ केसरी खंडू वाळुंज, खंडू तिकोने, राजू फलके, माऊली काळोखे, प्रतिभा हिरे पुष्पा भोकसे, जयश्री वाजे, बाळासाहेब भोंगडे, विजय भोंगाडे, वैभव भोंगाडे, नितीन भोंगाडे, दत्तात्रय भोंगाडे, भरत भोंगाडे, विजय सातकर, दिनकर सातकर अनिल सातकर, शरद येवले, प्रशांत तावरे, डॅनी शिंगारे, अनिल फुगे, निलेश काजळे , मदन शेडगे, सुरेश गायकवाड, मनोज देशमुख, भाऊ देवकर, शरद कुटे, मिलिंद बोत्रे, अनिल पडवळ, गणपत पडवळ, भाऊ मावकर, अमोल केदारी, लक्ष्मण बालगुडे, बाळासाहेब काजळे, बापट काजळे, गणेश काजळे, ओमकार काजळे, गणेश लालगुडे, योगेश लालगुडे, कुंडलिक लालगुडे, पांडुरंग लालगुडे ,अमोल येवले, राजू लालगुडे, भाऊ चोपडे, दत्ता चोपडे, नवनाथ चोपडे, योगेश कोंढाळकर, संतोष गोलांडे, हिरामण हेमगुडे, अविनाश वाघेरे, संतोष वाघेरे, ओंकार पवळे, सारंग वाघेरे, सागर वाघेरे, प्रशांत वाघेरे, सुरज वाघेरे, संवाद वाघेरे, केतन वाघेरे, ईश्वर वाघमारे, सनी लांडे, अजिंक्य राक्षे, संजय राक्षे, संतोष घुले, घनश्याम कुदळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकविरा आईच्या दर्शनानंतर मंगळवारी वेहेरगाव, दहिवली, पाथरगाव, खामशेत, खडकाळा, कुसगाव, चिखलसे, येवलेवाडी, नायगाव, अहिरवडे, मोहीतेवाडी, ब्राम्हणवाडी, वडगाव, सांगावी, कान्हे, साते शिवस्मारक आदी गावांमधून संजोग वाघेरेंचा प्रचार गावभेट दौरा पार पडला. यावेळी गावागावातून मिरवणूक काढून, फटाक्यांची आतषबाजी करून वाघेरे पाटलांचे जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: