'हर घर मोदी परिवार' अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

 


दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला 'मोदींचा नमस्कार'

पुणे : भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'हर घर मोदी परिवार' या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ १० हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १० लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला. घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी अभियानात प्रमुख सहभाग घेतला. 

या अभियानाअंतर्गत आज सकाळी सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दहा हजार कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन अडीच लाख कुटुंबातील दहा लाख मतदारांशी संवाद साधला.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना, काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 12 कोटी शौचालयांची बांधणी, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या उपलब्धींची मतदारांना माहिती देण्यात आली.

बावनकुळे म्हणाले, 'विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत. त्याला पुणे शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदींनी दहा वर्षे केलेले कार्य आणि विकसित भारताचा संकल्प यामुळे जनता कमळ चिन्हाचे बटन दाबून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान पदाची संधी देईल असा विश्वास वाटतो.'

पाटील म्हणाले, ‘अब की बार 400 पार ही आमची घोषणा आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही घरोघर संपर्क करीत आहोत. लाभार्थी आणि नवमतदारांशी विशेष संपर्क केला जात आहे. लाभार्थ्यांच्या योजना आणि सरकारची दहा वर्षातील कामगिरी लोकांना समजावून सांगण्यात येत आहे. मतदारांना मोदींची गॅरंटी असून ती प्रत्यक्ष मतपेटीतून दिसून येईल.'

मोहोळ म्हणाले, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून मी जनसेवेचे व्रत घेतले आहे. महायुतीने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात देश विकसित भारताच्या दिशेने प्रगती करत आहे. विकसित पुण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत, ही विनंती.'

घाटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा शाश्वत विकास होत आहे. त्यामुळे पुणेकर मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. मुरलीधर मोहोळ हे आजपर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आहे.'

'हर घर मोदी परिवार' अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग 'हर घर मोदी परिवार' अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग Reviewed by ANN news network on ४/०७/२०२४ १०:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".