अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत राहणार उपस्थित
पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही घटकपक्षांच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक उद्या ८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे असलेल्या रागा पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे, अशी माहिती समन्वयक संदीप खर्डेकर यांनी दिली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार ,शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टरचे प्रमुख ना. चंद्रकांत पाटील तसेच ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे,भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आ. सुनील शेळके, आ. अश्विनीजगताप, आ. अण्णा बनसोडे, आ. उमा खापरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, उपनेते इरफान सय्यद,भाजपा पिं.चिं अध्यक्ष शंकर जगताप ,शिवसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे,आर पी आय (आठवले गट ) चे स्वप्नील कांबळे,परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, कुणाल वाव्हळकर आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे खर्डेकर यांनी सांगितले.
आर पी आय (खरात गट ) रासप, शिवसंग्राम,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( जोगेंद्र कवाडे गट ),लोकजनशक्ती पक्ष, जनता दल सेक्युलर,जय मल्हार क्रांती संघटना,तसेच प्रहार संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना,लहुजी सेना,लहुजी शक्ती सेना ,ह्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असेही खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: