दिलीप शिंदे
सोयगाव : शहरालगत असलेल्या आमखेडा भागातील रामकृष्णनगर येथे दि.१४ एप्रिल रोजी दुपारी साडेेबारा ते दिडच्या दरम्यान दोन ठिकाणी तर तालुक्यातील कंकराळा येथे दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान भरदिवसा एक घरफोडी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रामकृष्णनगर येथील रहिवासी विजय किसन नरोटे, सुनील बोडखे यांचे घर चोरट्यांनी साडे बारा ते दीडच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून चोरट्यांनी माल लंपास केला आहे. तर तालुक्यातील कंकराळा येथे दीड ते अडीचच्या दरम्यान कृष्णा गायकवाड यांचे घरफोडले. सोयगाव पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री नऊच्या दरम्यान श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यानी किती ऐवज चोरून नेला त्या बाबत अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रामकृष्णनगर येथे ज्या ठिकाणी घरफोडी झाली त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर जुगाराचा अड्डा असून याठिकाणी जुगार खेळण्यास येत असलेले जुगारी अनोळखी असल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा रामकृष्णनगर येथे सुरू होती.शहराच्या चारही बाजूला जुगाराचे अड्डे असून हे कोण बंद करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही पाचवी घरफोडी असून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
मराठवाडा : आमखेड्यात दोन तर कंकराळ्यात एक, दोन तासात तीन घरफोड्या, पोलिसांसमोर आव्हान....
Reviewed by ANN news network
on
४/१४/२०२४ ०९:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१४/२०२४ ०९:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: